व्यक्तिगत माहिती कुठल्या प्रकारे चोरी होऊ शकते?

1.ऑनलाईन टॅक्सी बुकिंग अॅप द्वारे

taxiऑनलाईन टॅक्सी बुकिंग मुळे प्रवासाच्या समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. यावर नोंदणी  करण्याकरिता आपल्याला आपली वैयक्तिक माहिती द्यावी लागते ज्या मध्ये आपले नाव, मोबाईल नंबर आणि इमेल आदीचा समावेश होतो. टॅक्सी बुक करतांना आपला मोबाईल नंबर त्या चालकाला दिला जातो ज्याला आपल्या प्रवासाची जबाबदारी दिली जाते.चालक आपला मोबाईल नंबर चोरून त्याचा गैरवापर करू शकतो.

 • दोन वेगवेगळ्या फोन नंबर चा उपयोग करणे ज्यास्त योग्य होईल, एक इंटरनेट करता आणि दुसरा संपर्क करण्या करिता
 •  प्रवासाची बिल व माहिती नेहमी सांभाळून ठेवण्याची सवय लावा.
 •  गाडी (टॅक्सी) चालकाशी अनावश्यक बोलू (बडबड करू) नका.
 •  चालकाने निवडलेल्या रस्त्याविषयी सतर्क राहा.

2.ऑनलाईन डेटिंग / वैवाहिक वेबसाइट्स

matromonialहल्लीच्या काळी विवाह प्रस्तावांनी वेबसाईट च्या माध्यमातून एक नवीन रूप घेतले आहे. ज्या माध्यमातून ऑनलाईन डेटिंग (कुणाला भेटणे) / व बोलचाल करणे ,ओळख करणे सोपे झाले आहे.

बरेच जण बनावट फोटो आणि खोट्या पगाराची नोकरी दाखवून प्रोफाइल बनवतात व नोंदणी करतात. ते फोन नंबर / ईमेल आयडी / पारिवारिक माहितीची देवाणघेवाण करतात.

 • आपली वैयक्तिक माहिती देण्याआधी हे तपासून घ्या कि आपण पाहिलेल्या प्रोफाईल मधील माहिती खरी आहे व त्यांनी योग्य ते प्रमाण पत्र जोडली आहे.
 •  त्या व्यक्तीला भेटताना आपल्या परिवारातील कुणी व्यक्ती किंवा मित्र / मैत्रिणी सोबत ठेवा.

3.खोट्या वजन कमी करणाऱ्या जाहिराती / सौंदर्य अॅप्स / प्रवास आणि हॉटेल बुकिंग अॅप्स

appफसव्या वजन कमी करणाऱ्या जाहिराती / सौंदर्य अॅप्सच्या जाहिरातींचा सोशल मीडियावर पूर आला आहे. ते सुरुवातीला एका महिना / आठवड्यासाठी विनामूल्य त्यांचे अॅप्स वापरायला देतात.

तसेच ते आपल्या वैयक्तिक बँकेच्या माहिती विचारून पूर्व नोदणी करायला सांगतात. आपली नोंदणी कालबाह्य झाल्यानंतर ते पैसे कापण्या अगोदर पैसे कापू असे सूचना देणारे मेल पाठविण्याचे आश्वासन देतात, जे कदाचित करू शकतात किंवा नाही करू शकत आणि आपल्या नकळत आपले पैसे कापले जाऊ शकतात. लोकांनी "प्रवास आणि हॉटेल बुकिंग अॅप्स" डाउनलोड करावे व त्या मध्ये नोदणी करावी करिता ते आकर्षक सवलती देतात.

सवलती पाहून बरेच लोक (प्रवासी) तिकीट बुक करतात आणि पैश्याचं नुकसान करून घेतात कारण त्यांच्या नावे कुठलेच तिकीट किंवा हॉटेल बुक होत नाही.

 • आपली वैयक्तिक बँकेची माहिती देण्या अगोदर सर्व नियम व अटी व्यवस्थित वाचा.
 •  पैसे देण्याआधी संबंधित फ्लाइट / हॉटेल बुकिंग वेबसाइट वर जाऊन योग्य ती खात्री करून घ्या.

4.महिला सशक्तीकरण योजना

मोठ्या प्रमाणात महिला सक्षमीकरण योजनांचा दुरुपयोग खासगी कंपन्यांकडून केला जातो.ग्रामीण भागात मध्यस्त ही भूमिका बजावतात. ते योजनेबद्दल आणि त्यातील फायद्यांबद्दल माहिती देतात. विश्वास संपादन करतात आणि आपले किंवा आपल्या कुटुंबातील सदस्याचे नाव नोंदणी करण्यासाठी तपशील गोळा करतात.परंतु माहिती गोळा केल्यानंतर त्यांना या योजनेचा कुठलाच फायदा मिळत नाही.

 • सरकारी घोषित योजनांमध्ये नोंदणी करण्यासाठी अधिकृत कार्यालयाशी संपर्क साधावा.
 •  आपले स्वतःचे खाते उघडण्या करता जवळच्या बँकेला भेट देणे योग्य ठरेल.

5.घरी बसून कमवा / जॉब पोर्टल मध्ये होणारे घोटाळे

workमुख्यतः गृहिणींना घरी बसून कमवा असे आव्हाहन केले व आकर्षक प्याकेज दाखवून लक्ष्य केले जाते.

काही वेबसाईट वैयक्तिक / बँकेच्या माहिती सह रजिस्ट्रेशन करायला सांगतात आणि काम मिळवण्यासाठी एक ठराविक रक्कमी किंमत भरायला सांगतात. परंतु काम पूर्ण केल्यानंतरही त्यांना दिलेल्या (ऑफर केलेल्या) पॅकेजच्या नुसार त्यांना पैसे दिले जात नाहीत. तसेच नोंदणी करताना दिलेली रक्कम नोकरी सोडल्या नंतर देखील परत केली जात नाही.

वैयक्तिक माहिती चोरणारे चोर हे नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांचा शोध घेतात . हा शोध ते ऑनलाईन नोकरी देणाऱ्या पोर्टल च्या साहाय्याने करतात. आपण ऑनलाईन नोकरी चा फॉर्म भरताना जी माहिती भरतो त्यातील काही मुख्य बाबींचा वापर करून ते आपल्याला फसवे जॉब देऊ पाहतात. आपण ज्या शब्दांचा वापर करून ऑनलाईन नोकरी शोधत असतो त्या शब्दांचा वापर करून काही लोक आपल्याला नोकरी देण्याचा खोटा कॉल करतात आणि आपला विश्वास संपादन करतात

 • नोकरीची संधी स्वीकारण्यापूर्वी कंपनीबद्दल जाणून घ्या.
 •  ऑनलाईन नोकरी पोर्टल वरून जॉब शोधताना ज्या शब्दांचा वापर करता ते काम झाल्यानंतर डिलीट करा.

6.ब्लॉग मध्ये होणारे घोटाळे

bloggingब्लॉगर्स आपले लेख ऑनलाईन प्रकाशित करतात. जर या लेखांचा उपयोग करण्याचा अधिकार सर्वांनाच मोकळा असेल, तर या लेखाची खोटी प्रतिकृती तयार करून त्याचा उपयोग आर्थिक फायद्या साठी केला जाऊ शकतो.

 • आपला लेख ऑनलाइन प्रकाशित करण्यापूर्वी कॉपीराइट करणे योग्य ठरेल.
Page Rating (Votes : 5)
Your rating: