सोशल नेटवर्किंग हे आपल्या कुटुंबासह, मित्रांबरोबर, सहकार्यांशी संपर्क साधण्याचा आणि नवीन मित्र बनविण्याचा एक मार्ग आहे. सोशल नेटवर्क्स वापरण्यास आनंददायी आहेत, जॉब शोधण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे आणि मित्रांबरोबर, व्यवसायाच्या संपर्कासाठी आणि नातेवाईकांच्या संपर्कात राहण्यासाठी हे चांगले मध्यम आहे, तसेच यावर कुठेही काहीही शेअर करता येत. तसेच महिला त्यांचा सोशल नेटवर्किंग साइट्सचा वापर त्यांच्या मित्रांशी, कुटुंबियांबरोबर, मित्रांशी संपर्क साधण्यासाठी करू शकतात आणि त्यांचे अनुभव, ज्ञान आणि सल्ला इतरांबरोबर सामायिक करू शकतात. त्या सोशल नेटवर्किंग साइट्सचा उपयोग मातृभाषेद्वारे एकमेकांना आधार/धीर देण्यासाठी, करिअरचे ध्येय पूर्ण करण्यासाठी, एकमेकांना प्रेरणा देण्यासाठी किंवा सारखी आवड असलेल्या इतरांना शोधण्यासाठी करू शकतात.

वापरकर्ता एक महिला पालक, व्यावसायिक किंवा सामान्य महिला असू शकते आणि सोशल नेटवर्किंग साइट्सच्या सहाय्याने त्या जगाशी कनेक्ट होऊ शकतात आणि त्या द्वारे त्यांना अधिक उपयुक्त माहिती मिळू शकते. त्या त्यांच्या कल्पना सामायिक करू शकतात आणि इतर कल्पनांना मदत करू शकतात जे इतरांना मदतीचे ठरू शकते आणि बर्याच लोकांना मोठ्या नेटवर्कद्वारे चांगली कल्पना देखील मिळू शकते. महिला उद्योजक होऊ शकतात; सोशल नेटवर्किंगद्वारे त्यांचे व्यवसाय पसरवून त्यांना अधिक नफा मिळू शकतो. महिला, फेसबुक, व्हाट्सएप, ट्विटर इ. सारख्या अनेक सोशल नेटवर्किंग साइट्स वापरू शकतात.

गोपनीयते बद्दल च्या समस्याः

आपण काही गोपनीयता समस्यांचे दुर्लक्ष केल्यास आपल्याला धोका होऊ शकतो-

  • आपले फोटो आणि उपक्रम सार्वजनिकपणे सामायिक करणे.
  • आपल्या पोस्ट द्वारे आपले स्थान सामायिक करणे ज्या मुळे स्कॅमरना आपल्या स्थानाचा मागोवा घेण्याची संधी देतात.
  • ज्या मित्रांना आपण ओळखत नाही त्यानं आपला मित्रांच्या/ओळखीच्या यादीत जोडणे हे देखील सोशल नेटवर्किंग साइट्स वापरताना आपल्यासाठी जोखमीचे ठरू शकते.

धोके आणि आव्हाने

बनावट मित्रः

आपण अज्ञात व्यक्ती आपली मित्र म्हणून जोडल्यास ज्याला आपण वैयक्तिकरित्या ओळखत नाही अशी व्यक्ति खलील गोष्टी करू शकते

  • फोटो चोरी करू शकतात किंवा आपल्या क्रियाकलापांचा मागोवा ठेवू शकतात.
  • ती व्यक्ति बनावट नावाने प्रोफाइल बनवू शकते आणि आपल्या ओळखीस त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी नुकसान पोहोचवू शकतात.
  • ती व्यक्ति मानसिकरित्या किंवा भावनात्मकपणे आपल्याला ब्लॅकमेल करू शकते किंवा आपली बदनामी करू शकते.

ओळखीची चोरी:

सोशल नेटवर्किंगचा वापर करताना आपण सोशल नेटवर्किंग साइट्सवर अज्ञात मित्र बनविल्यास ओळख चोरीची समस्या येऊ शकते. ती व्यक्ति स्कॅमर असू शकते

  • आपली संवेदनशील आणि वैयक्तिक माहिती चोरून घेऊ शकते.
  • पैसे मिळवण्यासाठी आपली ओळख वापरुन, ओळख इ. चा तोतयागिरी करू शकते.

अपमानकारक, अश्लील किंवा असभ्य भाषा:

गैरवर्तन करणारे, अश्लील किंवा असभ्य भाषा ही आजची मोठी समस्या आहे ज्याला आज महिलांना तोंड द्यावे लागत  आहेत, बरेच बनावट मित्र आपल्याबरोबर अश्लील विषयांविषयी बोलू शकतात आणि ते कदाचित

  • मानसिकदृष्ट्या किंवा भावनिकपणे तुम्हाला त्रास देऊ शकतात. आपल्या पोस्ट किंवा फोटोवर अपमानकारक शब्द वापरुन आपली बदनामी करू शकतात.

बर्याच माहिती सामायिक करणे:

  • आपली अधिक माहिती सामायिक करणे जसे की आपले घर / कार्यालयीन पत्ता, कौटुंबिक संबंध, फोन नं. इ. आपल्यासाठी जोखमीचे ठरू शकते, स्कॅमर आपला पाठलाग करू शकते किंवा आपल्याला अडवू शकतो.

स्पॅम ई-मेलः

स्पॅम ई-मेल अनिश्चित अश्या वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती गोळा करण्यासाठी ई-मेल किंवा ई-मेल पत्त्यांच्या गटास पाठविलेले व आपल्याला गरज नसतांना एखाद्या उत्पादनाबद्दल ई-मेल द्वारे पाठवलेले जाहिरात असते.

फसवणूक करणारे आपल्याला स्पॅम ई-मेल पाठवू शकतात

  • या मध्ये काही ऑनलाइन खरेदी उत्पादनांबद्दल, आरोग्य विमा या बद्दल माहिती असू शकते आणि त्यामुळे फसवल्या जाऊ शकतो.
  • तसेच काही ई-मेल बनावट जॉब मुलाखतींसाठी असू शकतात
  • घरगुती उपकरणावरील काही खास ऑफरसाठी.

आणि आपण स्पॅम ईमेलमध्ये दिलेल्या फसव्या दुव्यांवर क्लिक केल्यास स्कॅमर आपली संवेदनशील माहिती मिळवू शकतो.

बनावट जाहिरात:

उत्पादनांच्या बनावट जाहिरातीसाठी स्कॅमरद्वारे सोशल नेटवर्किंग साइट्सला मुख्यत्वे लक्ष्य केले जाते, ते आपल्याला लक्ष्य करू शकतात आणि खालील गोष्टी करून आपली ओळखपत्र चोरू शकतात.

  • बनावट जाहिरातीचे स्वरूप मूळ जाहिराती सारखे बनवल्या मुळे आपण त्यांना खरे समजून फसतो, आणि आपण दुव्यावर क्लिक केल्यास आपली संवेदनशील माहितीस चोरी जाऊ शकते.
  • नकली अॅप आणि सेवा आपण स्थापित केल्यास त्याद्वारे ते आपली वैयक्तिक आणि संवेदनशील माहिती चोरू शकतात.

सोशल नेटवर्किंग साइट वापरताना महिलांनी काय करावे:

आपण सोशल नेटवर्किंग साइट्सवर विनंती स्वीकारण्यापूर्वी व्यक्तीचा प्रामाणिकपणा तपासा.

  • काही गोपनीयता सेटिंग्ज वापरा जसे आपले फोटो आणि क्रियाकलाप केवळ आपल्या कुटुंबिय आणि ज्ञात मित्र यांनाच सामायिक करणे.
  • सोशल नेटवर्किंग साइट निवडताना, गोपनीयता समस्या विचारात घ्याव्या, कुठलीही पोस्ट करण्यापूर्वी, चॅट करण्यापूर्वी, अपलोड किंवा डाउनलोड करण्यापूर्वी विचार करा व योग्य असल्यास मगच पुढे जा.
  • जर आपण नेटवर्किंग साइटवर भेटलेल्या व्यक्तीस भेटू इच्छित असाल तर आपल्या वडिलांना / पती / भावाच्या किंवा कुटुंबातील सदस्यांना परवानगी किंवा त्यांना कळवून जा, जेणेकरून ते आपल्याला काही सूचना देऊ शकतील आणि आपण कोणाशी भेटता हे देखील त्यांना माहीत असेल.
  • आपल्याला वाटत असेल की आपले सोशल नेटवर्किंग खात्या वरील माहिती मध्ये तडजोड गेले आहे किंवा आपली माहिती चोरी झाले आहे, तर अशी संशयास्पद माहिती त्वरित आपल्या नेटवर्किंग साइट समर्थन कार्यसंघाकडे सूचित करा.
  • आपल्या प्रोफाइलवर पोस्ट केलेल्या त्रासदायक किंवा असभ्य टिप्पण्या कधीही प्रतिसाद देऊ नका.

महिलांनी सोशल नेटवर्किंग साइट वापरताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत:

आपले नाव, कंपनी / घराचा पत्ता, फोन नंबर, वय, लिंग, क्रेडिट कार्ड ची माहिती यासारख्या कोणत्याही वैयक्तिक माहिती देऊ किंवा पोस्ट करू नका.

  • कोणालाही आपला संकेतशब्द देऊ नका.
  • नेटवर्किंग साइट्समध्ये आपल्या मित्रांची अशी माहिती पोस्ट करू नका, की ज्यामुळे कदाचित त्यांना धोका होऊ शकेल.
  • अज्ञात लोकांसोबत वेबकॅम चा वापर करू नका.
  • नेटवर्किंग साइट्समध्ये आपण करणार असलेल्या योजना आणि क्रियाकलाप पोस्ट करणे टाळा.
  • सोशल नेटवर्किंग साइट्सद्वारे आपल्याला मिळणार्या दुव्यांवर क्लिक करू नका. आपण साइटला भेट देऊ इच्छित असल्यास थेट मूळ वेबसाइट्सवरून जा.

सोशल नेटवर्किंग साइट्सवर आपण आपली गोपनीयता सेटिंग्ज कशी नियंत्रित करू शकता?

सोशल नेटवर्किंग साइट्समध्ये, डीफॉल्ट सेटिंगनुसार सर्व गोष्टी सार्वजनिक होतात, त्यामुळे आपल्या सुरक्षिततेसाठी असलेल्या बर्याच गोपनीयता सेटिंग्ज त्यांनी दिलेल्या असतात, त्यामुळे त्यांचा वापर करून आपण बर्याच समस्यांपासून स्वतःचे संरक्षण करू शकतो म्हणून  सर्व सुविधा वापरणे आवश्यक आहे.

  • आपण आपल्या पोस्ट / व्हिडिओ / गतिविधी या करिता अनोळखी लोकांना प्रतिबंधित घालू शकतो आणि गोपनीयता सेटिंग्ज मध्ये फक्त मी असा पर्याय वापरुन आपल्या संपर्कात असलेल्या आपल्या सदस्यांना सामायिक करू शकता.
  • आपण मित्र विनंती पर्याय बंद करू शकतो, जेणेकरून कोणीही आपल्याला विनंती पाठवू शकणार नाही.
  • आपण टिप्पणी विभागातील लोकांना प्रतिबंधित करू शकतो जेणेकरून आपल्या संपर्कातील सदस्य केवळ आपल्या क्रियाकलापावर टिप्पणी देऊ शकतील.
  • आपण अपरिचित व्यक्तीं करिता आपली वैयक्तिक / व्यावसायिक माहिती प्रतिबंधित करू शकता.
  • आपण आपला ऑनलाइन मोड बंद करू शकतो जेणेकरून आपण किती वेळ आणि कधी ऑनलाइन आहे हे कोणालाही कळू शकणार नाही.

Source: Smart Business

CSO

Page Rating (Votes : 8)
Your rating: